परिवर्तनाच्या क्षितिजा एक सैनिक मी
परिवर्तनाच्या क्षितिजा एक सैनिक मी
झेलतो वार अज्ञानांचे परी खंबीर मी !!१!!
जे जे हात माझे त्यांना जोडतो मी
मस्तीत संघटनेच्या माजत नाही मी !!२!!
कितीही गतिरोधक असो बेपर्वा मी
नाही जुमानत कोणा,पारदर्शक मी !!३!!
कितीही विरोध असो ध्येय बदलत नाही मी
तत्व सत्य नीतिचाच मार्ग चालतो मी!!४!!
सत्तेचे राजकारण समजावून घेतो मी
अस्तित्वाचा अहंकार टाळतो मी !!५!!
जमाखर्च आवर्जून तपासावा सांगतो मी
पुस्तक जीवनाचे सदैव उघडे ठेवतो मी!!६!!
प्रेम ........
प्रेम म्हणजे नेमकं काय असतं
हे नक्की का कोणाला कळत
ते तर सहज नैसर्गिक अन
मनातलं स्पंदन नसतं का ?!!१!!
प्रेम म्हणजे केवळ मौजमजा असते का ते तर दोन्ही मनांचा खरं तर स्वीकार नसतो का ? !!२!!
प्रत्येक प्रेम हे विकृतच
असं कशासाठी समजायचं
प्रेमात देखील सात्विकता नैतिकता
नसते अस कशाला मानायचं? !!३!!
प्रेम निर्मळ अमृततुल्य आहे तर
मग विरोध का करत बसायच
जे कांही करायचं ते उजेडात करायचे
अंधारात कशाला लपत छपत खेळायच !!४!!
प्रेमानं जग जिंकता येत मग ते का सोडायच
जो येईल त्याला आपलं का नाही म्हणायचं!!५!!
आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००