पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केल्या एकूण आठ मोटरसायकली जप्त

    पंढरपूर, २६/१२/२०२०- अट्टल घरफोडी करणारा चोर मोटरसायकल चोर निघाला असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याच्याकडून एकूण आठ मोटरसायकली जप्त केल्या आहेत.पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 858/2020 प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यांमध्ये फिर्यादी सोपान नारायण बंडगर,राहणार सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांची मोटरसायकल नंबर एम.एच.१० बी.के.५१०६ ही वासकर वाडा,काळामारुती जवळ येथून चोरी गेल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   सदर गुन्ह्याचे तपास कामी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर व त्यांचे पथक रवाना होऊन ते रेकॉर्डवरील आरोपींना तपासत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अतिश ऊर्फ महादेव हनुमंत सगर, राहणार 32 खोल्या,संतपेठ पंढरपूर हा एक मोटरसायकल वरती फिरत आहे.त्याचा शोध घेतला असता त्याचे ताब्यात सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल मिळून आली. त्याचेकडून सदर मोटारसायकल जप्त करून घेऊन त्याला अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याचेकडे इतर सात मोटार सायकली मिळून आल्याने त्यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी जप्त करण्यात आले आहे. 

    पोलिस सदर आरोपीकडे अधिक तपास करीत असून त्याच्याकडून आणखीन मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे.

    सदरची कामगिरीही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम,पंढरपूर उपविभाग आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस हवालदार सुरज हेंबाडे,बिपीनचंद्र ढेरे, शरद कदम, राजेश गोसावी,पोलीस नाईक इरफान शेख,गणेश पवार,शोएब पठाण,पोलीस कॉन्स्टेबल सिध्दनाथ मोरे,संजय गुटाळ,सुनील बनसोडे, समाधान माने,सुजित जाधव,अन्वर आतार,नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश गोसावी हे करीत आहेत.

अट्टल घरफोडी करणारा चोर निघाला मोटरसायकल चोर 
burglar who broke into house went on a motorcycle robbery
 
Top