२५० जणांनी रक्तदान केले


पंढरपूर,(प्रतिनिधी)- कै.अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अनिलराज मित्र मंडळ व अभिजित खटावकर मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार दिला प्रतिसाद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रतिसाद देत कै.विरर्मद अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरपूर अर्बन बँक बसवेश्वर चौका जवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


      या उपक्रमात सर्व रक्तदात्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या. जवळपास २५० जणांनी रक्तदान केले.यावेळी माजी नगरसेवक निलराज डोंबे,नगरसेविका सौ.स्वेताताई डोंबे, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक अंबादास धोत्रे,नगरसेवक विक्रम शिरसट,नगरसेवक अमोल डोके,उद्योजक अभिजीत पाटील,सुरज पावले, युवराज डोंबे,शिवराज डोंबे,अमित डोंबे,आशिष डोंबे,अँड राजेश भादुले,राजू खोबरे तसेच वीरर्मद कै.अनिलराज तरुण मंडळ व अभिजित खटावकर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वीरमर्द कै.अनिलराज डोंबे पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर 
blood donation camp on the occasion of Veermard late Anilraj dombe Remembrance day 
 
Top