सध्याच्या काळात रूग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे

पंढरपूर,०५/१२/२०२० - सध्याच्या काळात रूग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.अशा संकटाच्या काळात गरजू रूग्णांना रक्त मिळावे म्हणून विशाल मर्दा मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहर रेशन धान्य दुकानदार संघटना व पंढरपूर येथील व्यापारी,कामगार यांनी सक्रिय सहभाग घेत उत्स्फूर्तपणे ४० जणांनी रक्तदान केले . 

वाढदिवस साजरा न करता रक्तदान शिबीर आयोजित

   सदर शिबीर सुरू असताना तहसीलदार डॉ.सौ. वैशाली वाघमारे ,पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक अरूण पवार,पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सदिच्छा भेट देवून आयोजक व रक्तदाते यांना प्रोत्साहन दिले. 
सदर रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बॅंक येथे डॉ.प्रसाद खाडिलकर,डॉ.सौ.संगिता पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. विशाल मर्दा यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराने अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. परंतु १५ दिवसापूर्वी विशाल यांच्या आज्जी सौ.कौसल्याबाई नारायणदास मर्दा यांचे दुःखद निधन झाल्याने वाढदिवस साजरा न करता रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे मित्र परिवाराने ठरवले व हा उपक्रम अल्पकाळात नियोजन करून यशस्वी केला. अल्पावधीत रक्तदान शिबीराचे आयोजन करून देखील ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    विशाल मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न Blood donation camp conducted by Vishal Marda Mitra Parivar with helf of pandharpur blood bank prasad khadilkar   
 
Top