पंढरपूर,१४/१२/२०२०- सोलापूर शहरातील आदरणीय व्यक्तीमत्व राजस्थानी समाजातील पंडितजी उर्फ बजरंगलाल मदनलाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

      ५ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे लक्ष्मीनारायण मंदिर, द्वारकाधीश मंदिर व बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन सर्वांना भेटून आपल्या घराकडे येत असताना वाटेमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

    आपल्या मधुर वाणीने ते प्रत्येकाला आपलं करत असत. प्रत्येक विषयाचा अभ्यास त्यांना असायचा.बोलका स्वभाव असल्याने अनेकांशी त्यांचा संपर्क होता. सोलापूर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

    त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे,एक मुलगी, जावई असा मोठा परिवार होता.राजस्थानी समाजाच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत होते . पंढरपूर येथील पत्रकार दिनेश खंडेलवाल यांचे ते सासरे होते. सोलापूर राजस्थानी समाज बांधवांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
Top