मिर्ची टाकुन लुबाडण्याचा प्रयत्न तीन अज्ञात व्यक्तींनी केला


कुर्डुवाडी,(राहुल धोका) ,०४/१२/२०२०- कुर्डुवाडी शहरात काल सांय ७.४५ विठ्ठल मंदिरजवळ शुभंकर बाळु पाठक ,वय २६ ,त्यांचा कामगार तानाजी सलगर, वय ३६ यांना मिर्ची टाकुन लुबाडण्याचा प्रयत्न तीन अज्ञात व्यक्तींनी केल्यानंतर आज दिवसभर पोलिस पथके सदर भागात गस्त घालत होते. श्वान पथकाद्वारेही तपास करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. घटना घडल्यानंतर तत्काळ घटनास्थळी‌ पोलिस उपनिरीक्षक चिमणराव केंद्रे व पोलिसांनी‌ धाव घेतली होती.

घटनेची नोंद नाही

   सदर घटनेबद्दल व्यापाऱ्याने तक्रार दाखल न केल्याने अद्याप गुन्हा मात्र दाखल झालेला नाही.
सदर प्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. आरोपी सुटणार नाहीत.या‌ पुर्वीच्या प्रकरणातील आम्ही आरोपी‌ पकडले आहेत. नागरिकानींही पोलिसांना सहकार्य करावे - चिमणराव केंद्रे ,पोलिस उपनिरिक्षक, कुर्डवाडी 
  आज दिवसभर सदर भागात पोलिस गस्त चालु होती,त्यामुळे नागरीकांमध्ये उत्सुकता होती. सतत तपासासाठी पोलिस सायंकाळपर्यंत येत होते. विविध ठिकाणचे सिसिटीव्ही फुटेज तसेच चौकशीनंतर ही गुन्हा मात्र दाखल होवू शकलेला नाही.
 
Top