चाळीस लाख रुपयांची सुपारी घेऊन खून करण्याचा प्रयत्नात असणारे आरोपींना केले पंढरपूर शहर पोलिसांनी जेरबंद एक गावठी कट्टा कोयता कुुर्हाड केल्या जप्त 
  पंढरपूर,१०/१२/२०२० - पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारां कडून बातमी मिळाली की, हनुमंत जाधव,राहणार इस्बावी पंढरपूर,बंडू घोडके राहणार बोहाळी,तालुका पंढरपूर,बंडू मासाळ, राहणार धायटी, तालुका सांगोला व बापू उर्फ आप्पा शिवाजी गोडसे,राहणार कवठाळी,तालुका पंढरपूर यांनी नागनाथ शिवाजी घोडके ,राहणार बोहाळी,तालुका पंढरपूर यांचा खून करण्याकरिता सुपारी घेतली असून त्याचे जीवितास धोका निर्माण झाला आहे अशी माहिती मिळाली.

  मिळालेल्या माहितीची खातरजमा करता उपयोग पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून मिळालेल्या माहितीबाबत खात्री करण्याचे आदेशित केले. त्या आदेशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर व त्यांचे पथक यांना बंडू दामू मासळ,राहणार धायटी,तालुका सांगोला, हनुमंत भारत जाधव,वय वर्षे ३०,राहणार बोहाळी, तालुका पंढरपूर,बापू उर्फ आप्पा शिवाजी गोडसे, वय वर्षे ३५,राहणार कवठाळी,तालुका पंढरपूर, बंडू सिद्धेश्वर घोडके,वय वर्षे ३६,राहणार बोहाळी, तालुका पंढरपूर यांनी नागेश शिवाजी घोडके यांचे सोबत पूर्वी आप्पा शिवाजी गोडसे यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा व संतोष कोरके यांचेशी जमिनीच्या व्यवहारामधून झालेल्या वादामुळे त्याचा राग मनात धरून घोडके याने गावठी कट्टा, कोयता,कुराड,स्टीलचा पाईप अशी हत्यारे आणून नागेश घोडके यास जीवे मारण्याचे कटकारस्थान करून पूर्वतयारी केली होती, असे निष्पन्न झाल्याने नागेश शिवाजी घोडके यांची पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन चौकशी केली, सदरबाबत त्यांना सांगितल्यावर त्यांनी आरोपी बंडू मासाळ,बंडू घोडके, हनुमंत जाधव ,आप्पा शिवाजी गोडसे व संतोष कोरके यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 807/2020 भादवि कलम 115/120 (ब)सह शस्त्र अधिनियमन 07:25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सदरची कामगिरीही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम ,पंढरपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी करण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पो.हे.काँ. सुरज हेंबाडे,पो.ना.गणेश पवार पो.ना.इरफान शेख,पो.ना. शोएब पठाण,पो.ना.प्रसाद औटी,पो.कॉ.सिद्धनाथ मोरे, पो.कॉ.संजय गुटाळ,पो.कॉ.जाधव,पो.कॉ.समाधान माने, सायबर विभागाचे पो.कॉ.अन्वर आतार यांनी केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र गाडेकर हे करीत आहेत.

चाळीस लाख रुपयांची सुपारी घेऊन खून करण्याचा प्रयत्नात असणारे आरोपींना केले जेरबंद Accused of attempting to kill with a betel nut worth Rs 40 lakh arrested
 
Top