अपघात टाळण्यासाठी या मार्गावर गतीरोधक बसविणे,खड्डे बुजविणे अत्यावश्यक -शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश बुराडे

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती दरम्यानच्या अंतर्गत मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत.हे अपघात टाळण्या साठी सदर मार्गावर तातडीने गतीरोधक बसवावेत अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केली आहे.

      या मार्गावर बर्‍याच दिवसांपासुन विविध अपघातात अनेकांचा जीव जाता जाता वाचला आहे. कांहीजण गंभीर जखमी सुध्दा झाले आहेत. नुकताच एक अपघात घडला असुन या अपघाता तील जखमी व्यक्ती सध्या कोमात असुन त्यांचेवर सोलापूर येथील अश्‍विनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचेसोबतच्या इसमाच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झालेली आहे. अशा पध्दतीचे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर आवश्यक तेथे गतीरोधक बसविणे,मार्गावरील खड्डे बुजविण्याची अत्यावश्यकता आहे.

यामुळे या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून लक्ष घालुन येथील अंतर्गत मार्गावर आवश्यक तेथे गतीरोधक बसविणे व रस्त्याची दुरुस्ती करणेसाठी तातडीने हालचाल करावी अशा मागणीचे निवेदन लंकेश बुरांडे यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना दिले आहे.

     यावेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना उपशहर प्रमुख सचिन बंदपट्टे, तानाजी मोरे,शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे,शिवसेना शाखा प्रमुख प्रणित पवार, नारायण रेड्डी,विजय गंगणे,शिवसैनिक राघवेंद्र ऐनापुरे,अजय हुलवडे आदी उपस्थित होते.

पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले -शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश बुराडे यांची गतीरोधक बसविण्याची मागणी
Accidents on the road from Old Karad Naka to Shelke Vasti in Pandharpur increased 
 
Top