आपलं जगणं हेच वैभव ... .

आज ३१ डिसेंबर २०२० अखेरचा दिवस !
पृथ्वी सूर्याभोवती फिरते दिवसरात्र
चक्र निरंतर सुरू राहते !
नव काय जूनं काय सारे एकच असते !
माणूस बुद्धिवादी त्याने व्यवहार शास्त्र शोधलं
अन आज नद्या सुरू झालं
स्वागत निरोप हे ओघाने आलं
खरं तर गेलेली वेळ महत्वाची
पुन्हां परत येत नाही
तसेंच संधीच सोनं करावं
जीवन आनंदाच जगावं
संस्कार संस्कृती अशी असावी की
आपलं नांव सर्वांच्या मुखी नांदावं
गेल्यावरही ते सतत निघत राहावं
शिक्षण स्वावलंबन श्रम आपलं वैशिष्ठ ठराव
मनातून हिंसा वर्ज्य करावी
अपरिग्रहत्व आपलं भूषण असावं
प्रत्येक जीवाचा जगण्याचा हक्क मान्य करावं
अर्थपूर्ण संवाद जगणं
सुगंधीत करत हे ध्यानात घ्यावं
इतरांची निंदा नालस्ती व्यर्थ
यापेक्षा विकार विकृतीची पानगळ करत राहावं
वेळ वागणं महत्त्वाचे म्हणूनच
आपलं जगणं हेंच जीवन वैभव व्हावं
हेच सूत्र असावं "!!

आनंद कोठडीया,कृषीरत्न,जेऊर
९४०४६९२२००

आपलं जगणं हेच वैभव ... . aapla jagana hech vaibhav  


 
Top