स्थानिक नागरिकांकडून श्रींचे दर्शन देण्याची मागणी

पंढरपूर,२६/११/२०२० - कोरोना विषाणूच्या पार्श्वभमीवर राज्य शासनाने दि.१४/११/२०२० रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दि.१६/११/ २०२० पासून दर्शनसाठी खुले करून देणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन आँनलाईन बुकींग करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.


आज दि.२६/११/२०२० रोजी कार्तिकी एकादशी संपन्न होत आहे. कार्तिकी यात्रेला दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा मुळे दि.२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. तथापि पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांकडून श्रींचे दर्शन देण्याची मागणी होत आहे. ही बाब विचारात घेवून, उद्या शुक्रवार दिनांक २७/११/२०२० रोजी सकाळी ०६.०० ते रात्री १२.०० या वेळेत पंढरपूर शहरा तील स्थानिक नागरिकांना श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी आँनलाईन बुकींग करण्याची आवश्यकता नाही. मात्र पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिक असलेबाबतचा पुरावा (आधारकार्ड/मतदानकार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे. कोरोना विशाणूच्या पार्श्वभमीवर ६५ वर्षापूढील व्यक्ती,१० वर्षाखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे.

सदरचे पत्रक मंदिर समितीचे सदस्य आ.रामचंद्र कदम,श्रीमती शकुंतला नडगिरे,डाॅ.दिनेशकुमार कदम,श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे,आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर),अँड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ,भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
 
Top