पंढरपूर – “प्रयोगशाळांमधून प्रत्यक्षात प्रयोग करताना अनेक रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही रसायने निसर्गात मिसळतात. त्यातून हवा, पाणी व जमीन यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्याशिवाय वेळ, पैसा यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. ही हानी टाळण्यासाठी ऍनिमेशन पद्धतीचा वापर करून बनविलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आभासी प्रयोगशाळेच्या वापरातून विद्यार्थ्यांना दाखविता येतात.सध्या कोव्हीड-१९ या जागतिक महामारी मुळे शाळा- कॉलेजेस प्रत्यक्षात सुरु नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक हे इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया पार पाडत आहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. विज्ञान विषयातील प्रात्यक्षिके ही या माध्यमातून व्यवस्थित रीतीने घेता येतात.” असे प्रतिपादन चेन्नई येथील मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधील डॉ.आर. विजय सोलोमन यांनी केले.

रसायनशास्त्रांच्या आभासी प्रयोगशाळांचा परिचय’

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट-८ अंतर्गत रसायन शास्त्र विभागाच्या वतीने ‘रसायनशास्त्रांच्या आभासी प्रयोगशाळांचा परिचय’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय वेब सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलाचे प्रमुख डॉ. आर.बी.भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “देशात शाळा महाविद्यालये याच्यात भौतिक सोई सुविधां मध्ये प्रचंड तफावत आहे. मोठ मोठ्या शहरांमध्ये सर्व सोई सुविधांनी युक्त प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना वापरासाठी खुल्या असतात. तशा पद्धतीच्या प्रयोगशाळांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून हजारो महाविद्यालयातील लाखो शिक्षकांनी आपल्या कल्पना वापरून माहितीने परिपूर्ण असणारे व्हिडिओ बनविले आहेत. त्याचा वापर सर्व विद्यार्थ्यांना करता येतो. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील तफावत दूर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.”

या चर्चासत्राचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख रघुनाथ झांबरे यांनी केले. प्रमुख मान्यवरांचा परिचय डॉ. बालाजी लोंढे यांनी करून दिला. या चर्चासत्रास उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, रुसा समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव यांचे सह ६८७ विद्यार्थी व शिक्षक हजर होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राजेश कवडे, डॉ. जितेंद्र गुजर, प्रा सचिन बनसोडे, प्रा.अंकुश कदम, प्रा.सागर लामकाने, प्रा. विनोद कांबळे, डॉ. अमर कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तांत्रिक सहाय्य प्रा. राजेंद्र मोरे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. श्रीकृष्ण कऱ्हाळे यांनी मानले.

प्रयोगशाळांमधून प्रत्यक्षात प्रयोग करताना अनेक रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने ही रसायने निसर्गात मिसळतात. त्यातून हवा, पाणी व जमीन यांचे प्रदूषण होते. वेळ,पैसा यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. ते टाळण्यासाठी ऍनिमेशन पद्धतीचा वापर करून बनविलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आभासी प्रयोगशाळेचा वापर करावा.

 
Top