पंढरपूर,१३/११/२०२०-
सडे शिंपिता अंगणी गोमयाचे
वरी रेखिता दिव्य गोपद्म साचे
जिच्या पावले सौख्य लाभे घराला
नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला

पंढरपूर तालुका गोसेवा आयाम यांच्यावतीने गो पूजन

   वसुबारस व गोवत्स द्वादशीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर तालुका गोसेवा आयाम यांच्यावतीने पंढरपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी सवत्स धेनूचे समाजात जाऊन जेथे गोमातेची उपलब्धता नाही अशा वस्ती,गल्ली व उपनगरात जाऊन तेथे गोपालकांकरवी सर्वे गाय-वासरू नेऊन त्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करण्यात आले .


जिचा स्नेह पानावला रे म्हणोनि
मुदे चाखितो हे दही दूध लोणी
सवे पोषिते लेकरा वासराला
नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला


जिला कामधेनु असे संबोधले गेले आहे जिच्या स्नेहपूर्वक दुधाने आपले व आपल्या लेकरा बाळांचे पालन पोषण होते तिच्या गोमय गोमुत्राने सर्वरोग हरण होते.शेतकरी राजा आपल्या शेतीतून भरघोस धन धान्य उगवतो व समाजाची भूक भागवतो.जिच्या केवळ स्पर्शाने नवचैतन्य निर्माण होते अशा गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धापूर्वक नमन करण्याचा हा दिवस आहे. आपल्या हिंदू धर्माच्या रूढी परंपरा त्याच्या मागे विश्वकल्याणाची शास्त्र दडले आहे, ते टिकवणे आपले परम कर्तव्य समजून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचे स्वयंसेवक नेहमीच कार्य करीत आले आहेत. आपले सण समाजाभिमुख होऊन त्याचा प्रसार होऊन नवीन पिढीला त्याची उजळणी व्हावी या उद्देशाने या वर्षी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

   त्यासाठी पंढरपूर तालुका गोसेवा प्रमुख चिंतामणी दामोदरे व अन्य स्वयंसेवकांनी नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील चौफाळा येथे वासुदेव बडवे,उमदे गल्ली येथे तुकाराम खंदाडे,कवठेकर गल्ली दत्त घाट येथे चातुर्मासे मठ, मनिषानगर येथे परमेश्वर जमदाडे, दत्तनगर येथे अभिजीत कुलकर्णी,टाकली रोड वसाहत , इस्बावी येथे डॉ कदम,तालुक्यात अनवली येथे विनायक गांजाळे ,भंडीशेगाव,कोर्टी येथे श्री शिंदे गुरुजी,शिरढोण येथे नाना निकते, टाकळी ग्रामपंचायत येथे औदुंबर पोतदार, करकंब येथे अक्षय साठे, गोपाळपूर येथे धनंजय जोगदेव यांनी आपआपल्या परिसरात नियोजन केले होते.
 
Top