पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी,सातारा नाला, सोनके,बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतुक रोखली होती.
पंढरपूर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी ऊस पट्टयात शेतकर्‍यांच्या मिटींग व गावभेट दौरा सुरू करुन २५०० रुपये ऊसाचा दर जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भुमिका घेतली आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित होते.
 
Top