पंढरपूर - केंद्र सरकारने संसदेमध्ये आणलेले शेतकरी विधेयक रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते.त्याला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे swabhimani shetkari sanghatna andolan भोसे पाटी ता.पंढरपूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.सरकारने आणलेल्या या शेतकरी विधेयकामुळे राज्यातील बाजार समित्या व शेतकर्‍यांचे नुकसान होणार कारण हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याने ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली.


दोन महिन्यापूर्वी शेतकरी विधेयक संस्थेमध्ये पारीत करण्यात आले होते. या विधेयकाला भाजप वगळता देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. विधेयक मंजूर केल्यापासून राज्यभर मोर्चे निदर्शने आंदोलने सुरू आहेत.तरी सरकारची मागे सरकण्याची तयारी नाही त्यामुळे गुरुवारी भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे देशव्यापी रस्ता रोको आंदोलन करून मोदी सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यात आला.त्याला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आंदोलन करण्यात आले.त्याचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पंढरपूर टेंभुर्णी मार्गावरील भोसे पाटी ता.पंढरपूर येथे रस्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.


केंद्र सरकारने आणलेल्या या शेतकरी विधेयका मुळे शेतकरी आणि बाजार समिती यांचे नुकसान होणार आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना सरकारकडून शेतकर्‍यांचा फायदा करून देण्या ऐवजी व्यापाऱ्यांचा कसा फायदा होईल व शेतकऱ्यांचे कसे नुकसान होईल हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हे शेतकरी विरोधी विधेयक जोपर्यंत मागे घेतले जात नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे यापुढेही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.


यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, शहाजहान शेख,धनंजय पाटील, अमर इंगळे, रणजित बागल, रायप्पा हळणवर, नागनाथ मोहिते, नाना चव्हाण,सोमनाथ घाडगे, मनोज गावंधरे, आबा चव्हाण, नामदेव खोडके नामदेव पवार, संतोष शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे दत्ता व्यवहारे, विठ्ठल मस्के, मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री गिड्डे यांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला.

या रस्ता रोकोमुळे टेंभूर्णी पंढरपूर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक काही काळ बंद पडली होती वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन रस्ता रोको मागे घेतल्यानंतर ही वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली.
 
Top