पंढरपूर,प्रतिनिधी- केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विधेयक पास केल्यामुळे शेतकर्यांवर अन्याय झालेला  आहे. या कारणास्तव राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी , महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात,  महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्य़ात सह्यांची मोहीम राबविण्यात आली आहे. शेतकर्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नागेश गंगेकर यांनी व्यक्त केले. 
 
  शेतकरी व कामगार विरोधी हे काळे कायदे रद्द व्हावेत म्हणून ही सह्यांची मोहीम असल्याचे ओबीसी जिल्हा अध्यक्ष समिर कोळी यांनी सांगितले. 

  याप्रसंगी मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,राजू उराडे, प्रताप रजपूत,शहर सचिव बाळासाहेब आसबे,सचिव अमित अवघडे,देवानंद ईरकल , सोमेश्वर अभंगराव,संतोष शेळके,दिलीप वाडेकर,  अजय गंगेकर,मधू सुरवसे,मोहद्दीन शेख,समाधान देवरे,भैय्या वाडेकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
Top