अयोध्यातील राममंदिराच्या पुनर्बांधणीतील पायाशी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीच्या विट..Silver brick...
या चांदीच्या विटेवर पुढीलप्रमाणे मजकूर आहे
।। श्री गणेशाय नम: ।।
हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नानुसार अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने व सौ.रश्मी,ना.आदित्य,श्री.तेजस ठाकरे यांच्या सहकार्याने प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी एक खारीचा वाटा अर्पण करीत आहे.
श्रद्धापूर्वक वंदन .
ना.डॉ.नीलम गोऱ्हे
उपसभापती,महाराष्ट्र राज्य
कै.दिवाकर व लतिकाताई गोर्हे परिवार,जेहलम जोशी दि.१६ नोव्हेंबर,२०२०. बलीप्रतीपदा शके
अयोध्या राम मंदिर निर्माण कार्यासाठी आज “चांदिची विट” अर्पण सोहळा अयोध्येतील राममंदिराच्या पुनर्बांधणीत अर्पण करण्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीची विट तयार करण्यात आली होती.ही विट श्री राम मंदिर न्यास अयोध्या यांचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज पुण्यात आले असल्यामुळे ,यांच्याकडे आज दि.१५ नोव्हेंबर,२०२० रोजी सायं ५.३० वाजता वेदव्यास प्रतिष्ठान,दत्त मंदिर, शिवाजीनगर,पुणे येथे ना.नीलमताई गोर्हे , उपसभापती,विधान परिषद व शिवसेना उपनेत्या यांनी सुपूर्द केली.