शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथील स्वारगेट येथील बाळासाहेब कलादालनातील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन...
पुणे,दि.१७/११/२०२०-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे shivsenapramukh balasaheb thakare यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आहेत त्या ठिकाणी राहून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे nilam gorhe यांनी पुणे येथील बाळासाहेब कलादालन, स्वारगेट, पुणे येथे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी ना.डॉ.गोऱ्हे बोलतांना म्हणाल्या की, शिवसेना प्रमुखांनी ८०%समाजकारण व २०% राजकारण अशी भुमिका मांडली होती. आता मात्र कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १००% सामाजिक भुमिकेतुन मदत कार्य करत आहेत. आजच्या शिवसेनेच्या सत्तेच्या सोपानास बाळासाहेब ठाकरेंचे विचार व कार्य यातुनच चालना मिळाली आहे.

यावेळी पुणे शिवसेना सह-संपर्कप्रमुख प्रशांत बधे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, नगरसेवक बाळा ओसवाल, राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख अमोल रासकर, सचिन देडे युवराज शिंगाडे, राजू विटकर, चंदन साळुंके,कमलेश मानकर,महिला आघाडीच्या सुषमा तळेकर,श्रुती नाझरीकर,सुरेंद्र चिकणे, अरुण पापळ,ऋषभ नानावटी,सुभाष धेंगले,सुधीर शेळके,प्रशांत लोंढे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top