शिवसेना विभागप्रमुखांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

  पंढरपूर,(प्रतिनिधी) - वाट चुकून हरवलेल्या एका चिमुकल्या मुलीस पंकज राजाराम डांगे-कोळी शिवसेना विभाग प्रमुख, उपनगर पंढरपूर यांनी पालकांच्या स्वाधिन करुन एक प्रशंसनीय काम केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,दि.०५ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०४.०० वाजण्याच्या सुमारास मंगळवेढेकरनगर, पंढरपूर या परिसरात पंकज राजाराम डांगे-कोळी यांना एक तीन वर्षाची चिमुरडी वाट चुकल्याने भटकताना आढळून आली. तिच्यामागे भटकी कुत्री लागलेली होती. हे दृश्य पाहून प्रसंगावधान राखत पंकज राजाराम डांगे-कोळी यांनी तातडीने सदर मुलीची कुत्र्यांच्या हल्ल्यापासुन सुटका केली. तिला खाऊ घातले, अंगावर कपडे परिधान केले.तिच्या आई वडीलांचा शोध घेण्यासाठी त्यांनी या मुलीला घेवुन लिंक रोड व परिसरातील अनेक उपनगरे पिंजुन काढली परंतु यात त्यांना अपयश आले. 
श्री.डांगे यांच्या आजच्या या कार्याचे सर्वांनी कौतुक करताना प्रत्येक नागरिकाने आपल्या मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर श्री.डांगे यांचा आदर्श घेवून त्यांचेप्रमाणेच आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन पीएसआय राजेंद्र गाडेकर यांनी केले आहे .
     यानंतर त्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन गाठले आणि याबाबत पोलीसांना माहिती दिली.पोलीस ठाण्यात आल्या नंतर निर्भया पथकाच्या महिला पोलीसांनी सदर मुलीस मायेने जवळ घेत दिलासा दिला. कांही तासांनी संबंधीत मुलीचे आई-वडील तिला शोधत पोलीस स्टेशनला आले. यावेळी आईची आणि मुलीची नजरानजर होताच मुलीने आईकडे झेप घेतली. आईच्या डोळ्यातुन आनंदाचे अश्रू वाहु लागले. हे दृश्य हृदय हेलावणारे होते. तोपर्यंत पंकज राजाराम डांगे-कोळी हे पोलीस स्टेशनमध्येच थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, अजय हुलवडे हे सुध्दा होते. वैष्णवी रामेश्‍वर गायकवाड (वय-३), रा.पंतनगर परिसर, पंढरपूर असे या मुलीचे नाव असल्याचे समजले. मुलीचे आई-वडील बिगारी कामगार असून ते बांधकामावर मजुरीचे काम करतात. नजरचुकीने मुलगी दुर गेल्याने रस्ता चुकली होती,अशी माहिती तिच्या आई-वडिलांनी दिली. यावेळी ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या समक्ष सदर मुलीस तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.यावेळी पीएसआय राजेंद्र गाडेकर व टीम तसेच निर्भया पथक उपस्थित होते. 
 
Top