डॉ.नीलम गोऱ्हे,उपसभापती विधान परिषद यांच्या प्रयत्नांमुळे येवलेवाडी, पिसोळी पुणे येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये शिव भोजन थाळी

पुणे - येवलेवाडी,पिसोळी,पुणे तेथे चार ते साडेचार हजार लोकांची कुष्ठरोग्यांची वसाहत आहे.या ठिकाणी कुष्ठरोग्यांना आवश्यक असणारी शिवभोजन थाळी सुरू करण्यासंदर्भात माजी सरपंच मच्छिद्र दगडे व सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड वंगार हे गेले वर्षभर प्रयत्न करत होते. याबाबत श्री वंगार यांनी हर्षल प्रधान, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी यांची भेट घेतली.

  ही माहिती घेऊन श्री प्रधान यांनी यासंदर्भात उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे लक्ष वेधले. कुष्ठरोग्यांना आपल्या हाताने स्वयंपाक करता येत नसल्यामुळे त्यांना तयार जेवण उपलब्ध होणे आवश्यक होते. या दरम्यान शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजुन घेतल्या. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शिवभोजन थाळी मंजूर करण्यासाठी सविस्तर पत्राने कळविले होते.तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी पुणे यांना यासंदर्भात निर्देश दिले होते.

त्यानुसार येवलेवाडी पिसोळी,पुणे येथे दि ०१ नोव्हेंबर २०२० रोजीपासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. यामुळे कुष्ठरोग्यांची मोठी सोय झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड वांगर यांनी सविस्तर पत्र देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पालकमंत्री पुणे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती विधान परिषद यांचे आभार मानले आहेत.
 
Top