वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकूरोली येथे Covid-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक संपन्न
पंढरपूर दि.१९/११/२०२०, (प्रतिनिधी)- २३ नोव्हेंबर २०२० पासून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्या संदर्भात वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक संपन्न झाली. संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, माजी प्राचार्य ज्येष्ठ ग्रामीण कथाकार शिवाजीराव बागल सर उपस्थित होते.

  यावेळी बोलतांना कल्याणराव काळे म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी आपल्या शैक्षणिक संकुलात ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते.शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा प्रत्यक्षपणे सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरू कराव्यात तसेच सर्व विद्यार्थ्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व शैक्षणिक संकुलातील संस्थांना थर्मलस्कॅनिंग, ऑक्सीमिटर ,हँड सॅनिटायजर इत्यादी आवशक्य सर्व सुविधा पुरवण्याची सोय केली आहे. तरी आपण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण खबरदारी घेत प्रत्यक्षपणे शिक्षण सुरू करणे ही आपली जबाबदारीअसून  शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांची एकी हीच खरी ताकद असून एकत्रितपणे सर्वांनी सुसंवाद साधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे असे आवाहन केले.

   संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी म्हणाले की प्रत्यक्ष शाळेची घंटा वाजणार असली तरी शिक्षकांची जबाबदारी खूप मोठी आहे. आपण एकत्रितपणे सर्व खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करणे गरजेचे आहे.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .

 प्राचार्य एच आर जमदाडे, प्राचार्य शिवाजीराव शेंडगे, प्राचार्य अनिल कोलगे,मुख्याध्यापक  दादासाहेब खरात, वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष गुळवे यांनीही समायोचित मनोगते व्यक्त केली.

  यावेळी श्रीमंतराव काळे प्रशाला जैनवाडी, धोंडेवाडी या शाखेतील  सहशिक्षक संजय काळे यांची पंढरपूर तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्या बद्दल व बहुजन शिक्षक महासंघाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सहशिक्षक नवनाथ गायकवाड यांना मिळाल्याबद्दल संकुलाच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  या विचार-विनिमय बैठकीसाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थिती होते.
 
Top