संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबीरात ६१ जणांचे रक्तदान 

 कुर्डूवाडी,(राहुल धोका),०४/११/२०२०- येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन प.पु.चाॅंदभाई तांबोळी, माढा ज्ञानप्रचारक यांनी दिप प्रज्वलन करून केले

  यावेळी प.पु.सुनील धोत्रे,सेक्टर संयोजक, टेंभुर्णी सेवादल शिक्षक हरी माने,संचालक किरण पाटणकर,माढा , समाधान राऊत पंचायत समिती सहाय्यक प्रशासन अधिकारी,बागल ,धोत्रे भाऊसाहेब,स्वप्नील कांबळे,कैलास कांबळे शकील भैय्या,सौरभ जगताप ,उमेश पाटील नगरे,मोहन डिकोळे तसेच साधसंगत टेंभुर्णी,कुर्डूवाडी, चिंचगाव,सापटणे,माढा, बावी, कुर्डु,शेवरे,भिमानगर येथील प्रबंधक सेवादल महात्मा,माता बहेनजी , पंढरपूर, बार्शी रक्तपेढी डाॅक्टर टिम उपस्थित होते.

  या उद्घाटनप्रसंगी बागल साहेब यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.सेक्टर संयोजक सुनील धोत्रे यांनी संत निरंकारी मंडळाचा इतिहास,रक्तदानाचे महत्त्व ,मंडळाचे समाजकार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. चांदभाई तांबोळी यांनी सद्गुरू सत्संग रक्तदान शिबीर याबद्दल मार्गदर्शन केले. 

      डाॅ.जयंत करंदीकर यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून आध्यात्मिक विषयावर सुंदर प्रवचन केले. कार्यक्रमास सर्व साधसंगत सेवादल माता बहेनजी यांनी श्रमदान केले.या शिबीरात एकूण ६१  रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 
Top