सध्या पारेषण काळ सुरू असल्याने नागरिकांनी किटकजन्य आजार व साथरोग यापासून बचाव करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी,हिवताप अधिकारी किरण मंजुळ यांनी केले आहे.
मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी जनतेस आवाहन करताना,covid-19 प्रतिबंधासाठी सँनी टायझर, मास्क व सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा. हात साबणाने वारंवार धुवावेत तसेच गर्दीत जाण्याचे टाळावे.आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ तसेच नदी पात्र आणि वाळवंट साफ राहण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
त्यासाठी आरोग्य विभाग व नागरी हिवताप योजना, पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्याकडून पंढरपूर शहरात कोठेही अस्वच्छता राहून साथीचे आजार वाढू नयेत यासाठी शहरातील उपनगरे व वाळवंटात स्वच्छता अभियान नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत आहे असेही सांगितले.