कॅनरा बॅंकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडचे बोंबाबोंब आंदोलन    
   पंढरपूर,(विशेष प्रतिनिधी) - खेडभाळवणी ता. पंढरपूर येथील काही शेतकऱ्यांनी मे २०१८ मध्ये दिड लाखाच्या आत कॅनरा बॅंक,पंढरपूर यांचे पिक कर्ज घेतलं होते.हे शेतकरी भिमा नदी पुरग्रस्त प्रवण क्षेत्रात येतात.परंतु दि.३१/०३/२०१९ ते ३०/०९/२०१९ या कालावधीत सदर शेतकरी थकीत कर्जदार असल्याने त्यांना महात्मा जोतिराव फुले कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नाही.कॅनरा बॅंकेचे मनमानी व गहाळ कारभारामुळे त्यांनी या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती जाणिवपूर्वक शासनास सादर केली नाही. ही जबाबदारी बॅंकेची असतानासुद्धा अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्यांना नविन कर्ज घेण्यासाठी अडचणी येत आहेत.

      वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही सदर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने येत्या शुक्रवारी दि.१३/११/२०२० रोजी संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने शेतकर्यांना व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन स.११.०० वा.कॅनरा बॅंकेसमोर बोंबाबोंब  आंदोलन करणार असल्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, सोलापूर जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे,तावशीचे अध्यक्ष अमोल कुंभार यांनी बॅंकेचे अधिकारी व सहाय्यक निबंधक व पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना दिले आहे.
 
Top