प्रकृती चांगली व्हावी यासाठी पंढरपूर रिपाइंतर्फे बुद्ध विहारमध्ये प्रार्थना

पंढरपूर, ०१/११/२०२०- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athawale आणि सौ सीमाताई रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना झालेली कोरोनाची बाधा दूर व्हावी आणि त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर शहरातर्फे पोर्णिमे दिवशी बुद्ध विहारमध्ये प्रार्थना करण्यात आली अशी माहिती संतोष पवार रिपाई शहर अध्यक्ष (आठवलेे गट) पंढरपूर यांनी दिली.


यावेळी रिपाइंच्यावतीने पंढरपूर शहराध्यक्ष संतोष पवार, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब कसबे,समाधान लोखंडे,सचिन गाडे,पोपट क्षीरसागर,सुधीर मागाडे सर,सचिन भोरकडे, आर.पी.कांबळे,मुकुंद मागाडे, मारुती ठोकळे,बाळासाहेब सर्वगोड यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top