पोलीस ठाणेकडे नोंद मात्र धमकी दिल्याची

कुर्डूवाडी,(राहुल धोका)- येथील सराफ व्यापारी विशाल पुर्वत यांना पिस्तुलाचा pistol robbery दाखवून धमकावण्याचा प्रकार घडला असल्याचे संपर्क साधून प्रतिनिधीला सांगितले.

सदर घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे .यापूर्वीही सराफ व्यापाऱ्याच्या पत्नी चे मंगळसूत्र पळवल्याची घटना घडली आहे. शहरातील व्यापारी वर्गावर यापूर्वीही हल्ला झाल्याची घटना झाली असून त्यामुळे हा विषय सर्वत्र चर्चेचा झाला असून याबाबत कुर्डुवाडीतील पोलीस ठाणेकडे मात्र धमकी दिल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी विशेष चौकशी केली जावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
 
Top