शिवसेना पंढरपूर शहरच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन


पंढरपूर,१६/११/२०२०- शिवसेना पंढरपूर शहरच्यावतीने pandharpur Shivsena भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा पारितोषक वितरण समारंभ रविवार दि.१५/११/ २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता पार पडला.


या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक कुमारी नेहा सुनिल आसबे, दाळे गल्ली, पंढरपुर हिस पंढरपुर तालुक्याचे शिवसेनेचे पहिल तालुका प्रमुख अरुण कोळी आणि पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि जेष्ठ शिवसैनिक संजय घोडके यांच्या हस्ते देण्यात आले, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक लिंगेश्वर शशिकांत कुंभार,दाळे गल्ली, पंढरपूर यास शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव आणि शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे यांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संदीप मोहीते,घडशी गल्ली,पंढरपूर यास शिवसेना ग्राहक सं.कक्ष जिल्हा प्रमुख जयवंत माने आणि शिवसेना पंढरपुर तालुका संघटक संदीप केंदळे यांच्या हस्ते देण्यात आले.


या कार्यक्रमात ६ उत्तेजनार्थ बक्षिसे ही देण्यात आली,त्यात अनुक्रमे कुमारी ऐश्वर्या सतिश कुलकर्णी, मेंढे गल्ली पंढरपुर, अभिषेक कुलकर्णी, हरीनयन पार्क, इसबावी,कुमारी श्वेता लक्ष्मण घाडगे,दाळे गल्ली पंढरपुर,प्रथमेश रसाळ, सहकार तालीम पंढरपुर,समर्थ राजकुमार तावसकर,झेंडे गल्ली, पंढरपूर, कुमारी आदीती मनोज पिंपळे, दाळे गल्ली पंढरपूर यांना देण्यात आले तसेच या किल्ले स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदविला त्या प्रत्येक सभासदाला प्रमाणपत्र देण्यात आले.


या कार्यक्रमास शिवसेना ग्राहक सं.कक्ष उपजिल्हा प्रमुख सिद्धनाथ कोरे,शिवसेना उपशहर प्रमुख पोपट सावतराव, बाबासाहेब अभंगराव, विनय वनारे,समाधान अधटराव, अविनाश वाळके, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी, अरुण कांबळे,विजय जाधव,पप्पू पितळे,गणेश वाघमारे, शाखा प्रमुख प्रणित पवार, शिवाजीराजे कोष्टी तसेच शिवसेना पंढरपूर शहरमधील शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.


      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शिव सैनिक काकासाहेब बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,विनय वनारे,पंकज डांगे कोळी, महेश भोसले, राघवेंद्र एनापुरे,गुरु अष्टेकर आणि इतर सहकार्यानी पार पाडला.


 
Top