लोप पावत चाललेल्या किल्ले बांधण्याच्या कलेला पुर्णजिवीत करण्यासाठी

पंढरपूर - लोप पावत चाललेल्या किल्ले बांधण्याच्या कलेला पुर्णजिवीत करण्यासाठी पंढरपुर शिवसेनेतर्फे किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.पंढरपुर शिवसेना शहरच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना पंढरपुर उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,विनय वनारे, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी,महेश भोसले, युवा सेना समन्वयक अमित गायकवाड यांच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या ऐतिहासिक परंपरांची जपणूक करण्याचे कार्य करण्यात येत आहे.

जगभरातील लोकांनी हिंदू संस्कृतीचा आदर डोळ्यासमोर ठेऊन,त्यातील शास्ञ व संस्कृती नुसार सण,उत्सव,विविधतेतुन एकता जोपसणा-या परंपरा घेऊन एक आदर्श ऐतिहासिक वारसा जोपासला आहे. त्यापैकी दिवाळी ह्या सणाचा वाटा मोठा आहे. दिवाळीतील प्रतिकृत किल्ले हे ऐतिहासिक शिवशाहीचे प्रतिक जोपासुन लहान थोरांना उत्तेजन व धाडसी प्रेरणा देतात.

आजचा हा प्रेरणादायी बालक हा उद्याचा सामर्थ्यवान देशाचा आधारस्तंभ

आजचा हा प्रेरणादायी बालक हा उद्याचा सामर्थ्यवान देशाचा आधारस्तंभ बनतो.तो अशा प्रतिकृतीच्या प्रेरणा स्थानामुळेच,याच उद्देशाने आम्ही खुली किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आहोत.

हे स्पर्धेचे १ले वर्ष आहे.तरी या किल्ले बांधणीच्या निमित्ताने आपल्या वैभवशाली शिवराज्याला उजाळा देऊ, बाल मावळ्यांना किल्ल्याच्या देशा म्हणल्या जाणा-या मराठी मातीतील सर्व किल्ल्यांची माहिती व्हावी. शिवरायांच्या विचाराचे बाळकडु त्यांना पाजले जावे यासाठी हा उपक्रम आहे.
या उपक्रमात पंढरपुर शहरातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केले आहे.
सदर स्पर्धा निकाल रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता जुना कराड नाका, गाताडे प्लॉट, लाँ कॉलेजजवळ पार पडणार असून शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी ६ वाजेपर्यंत स्पर्धकास संपर्क करुन किल्ले परिक्षण केले जाणार आहेत. किल्ले प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहेत.

किल्ले स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ११००₹ रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल, द्वितीय क्रमांक ७०१₹ रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक ५०१₹, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आशा प्रकारे बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून ३ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि स्पर्धेमध्ये भाग घेणार्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या किल्ले स्पर्धा उत्सव समिती प्रमुखपदी शिवसेना पंढरपुर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, किल्ले स्पर्धा उत्सव समिती च्या उपप्रमुखपदी शिवसेना उपशहर प्रमुख विनय वनारे तर प्रसिद्धी प्रमुखपदी शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी,महेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

नाव नोंदणीसाठी लंकेश बुराडे - ९६२३७०८८८१
विनय वनारे - ७०२०१७२३४५
पंकज डांगे-कोळी - ९८८१०८८०४५
महेश भोसले - ९९२२२३५१२३
यांच्याशी संपर्क साधावा.
 
Top