पंढरपूर, २३/११/२०२०- पंढरपूर येथील नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच सर्व सदस्य पदाधिकारी व आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नागरी हिवताप योजना, नगरपरिषद पंढरपूर कार्यालया मार्फत पंढरपूर शहरात किटकजन्य रोग प्रतिबंधक व नियंत्रणा साठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डास आळी नाशक फवारणी,जंतुनाशक फवारणी , पाठीवरील पंपाद्वारे करण्यात येत आहे. कंटेनर सर्वेक्षण धूर फवारणी ,डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे,कोरोना प्रतिबंधासाठी फवारणी व आरोग्य शिक्षण इत्यादी कार्यवाही केली जात आहे.


२३ नोव्हेंबर अखेर एकूण १७ डासोत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले असून शहरात एकूण १८ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. नियंत्रणासाठी पंढरपूर शहरातील एकूण एकवीस हजार ५७२ घरांमध्ये व ३४८ मठ परिसरात धूर फवारणी करण्यात आली. किटकजन्य आजारा साठी सध्या पारेषण काळ सुरू असल्याने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ,तयांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा व आपल्या घर व मठ परिसरात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसेच घरांमधील फ्रीज,कूलर फुलदाण्या, कुंड्या इत्यादींमध्ये पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. घराभोवतालच्या भंगार सामान,निरुपयोगी टायर नारळाच्या करवंट्या सामानाची त्वरित विल्हेवाट लावावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.जून ते डिसेंबर २०२० अखेर पारेषण काळ सुरू असल्याने नागरिकांनी किटकजन्य आजार व रोग यापासून बचाव करण्यासाठी शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,आरोग्य अधिकारी यांनी जनतेस केले आहे.तसेच covid-19 च्या प्रतिबंधासाठी सँनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा.हात साबणाने वारंवार धुवावेत तसेच गर्दीत जाण्याचे टाळावे असे आवाहन आरोग्य विभाग व नागरी योजना,पंढरपूर नगरपरिषद,पंढरपूर यांचेकडून करण्यात येत आहे.


ज्या नागरिकांना गप्पी मासे हवे आहेत त्या नागरिकांनी हिवताप नागरी योजनेच्या कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन अधिकारी किरण मंजुळ यांनी केले आहे.
 
Top