पंढरपूर - पंढरपूर नगर परिषद कामगार संघटना व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना यांनी पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, सातव्या वेतनाचा फरकाची रक्कम मिळावी व दिवाळी ॲडव्हान्स मिळावा 
व इतर विविध मागण्यांबाबत दिवाळीपूर्वी आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती . यावर आमदार प्रशांत परिचारक,नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक राजू सर्वगोड,विक्रम शिरसट, संजय निंबाळकर,कृष्णा वाघमारे,माजी नगरसेवक निलराज डोंबे यांच्यासमवेत कामगार नेते सुनील वाळुजकर नानासाहेब वाघमारे ,शरद वाघमारे , नागन्नाथ गदवालकर, गुरू दोडिया यांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली आहे. 


त्यानुसार आमदार प्रशांत परिचारक व पदाधिकारी यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे फरकापोटी रु ५०००,दिवाळी अँडव्हान्स रु ५००० व प्रोत्साहन भत्ता रु १००० असे रु अकरा हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले.यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी संतोष सर्वगोड,जयंत पवार,किशोर खिल्लारे, अनिल गोयल, धनंजय वाघमारे,महावीर कांबळे, प्रीतम येळे,तानाजी अधटराव,सुखदेव माने,पोपट जाधव,संजय माने,चिदानंद सर्वगोड,पराग डोंगरे, गणेश धारूरकर हे उपस्थित होते.

   पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी यांना दिवाळी ऍडव्हान्स, सातवा वेतन आयोगाचा फरक व प्रोत्साहन भत्ता म्हणून अकरा हजार रुपये दिवाळीपूर्वी मिळणार आहेत.
 
Top