संबधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा शासनाने अद्याप दाखल केला नाही 

पंढरपूर,(नागेश आदापूरे)-पंढरपूर येथे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadanvis विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी मागील महिन्यात कुंभारघाट kumbhar ghat येथे झालेल्या दुर्घटनेत महादेव कोळी समाजातील नावाडी कै गोपाळ अभंगराव यांच्या कुंटुबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते त्यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव व नगरसेवक विक्रम शिरसट यांनी निकृष्ठ दर्जाचे घाट बांधण्याचे काम केलेल्या संबधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा शासनाने अद्याप दाखल केला नसल्याने तो दाखल करावा व कुंटूबातील वारसांना शासकीय नोकरी व पंतप्रधान आवास योजनेत त्यांना घर मिळवून दयावे अशी मागणी केली.

आपण या प्रकरणात लक्ष घालू - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण या प्रकरणात लक्ष घालू आणि मयत कुंटूबियांच्या वारसांना योग्य न्याय मिळवून देवू अशी ग्वाही दिली. या वेळेस माजी मंत्री आ सुभाष देशमुख,माजी मंंत्री विजयकुुमार देशमुख , विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट व कोळी समाज बांधव आदी उपस्थित होते.
 
Top