पंढरपूर,दि २५/११/२०२० - कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिक शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन २०२० यावर्षी कार्तिकी यात्रा गुरूवार, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२० रोजी आहे. 


      या दिवशी पहाटे २.२० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार,Ajit Pawar महाराष्ट्र यांचे हस्ते श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. दि.२५/११/ २०२० ते दि.२७/११/२०२० या कालावधीत श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.

त्यानुसार श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण ६ विणेक-यांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने कवडुजी नारायण भोयर वय ६४ वर्षी रा.मु.डौलापूर,पो.मोझरी शेकापूर,ता. हिंगणघाट,जि.वर्धा यांची दि.२२/११/२०२० रोजी निवड करण्यात आली आहे.

कवडुजी नारायण भोयर हे मागील ९ ते १० वर्षा पासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबियदेखील माळकरी आहेत. मागील ८ महिन्यांपासून लाॅकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.

त्याप्रमाणे कवडुजी नारायण भोयर व सौ. कुसुमबाई कवडूजी भोयर या दापत्याची कार्तिकी एकादशी दिवशी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभहस्ते होणा-या श्रींच्या शासकीय महापुजेसाठी निवड करण्याबाबत मंदिर समितीचे सदस्य आ.रामचंद्र कदम,श्रीमती शकुंतला नडगिरे, डाॅ.दिनेशकुमार कदम,श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे,आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अँड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ. श्री.भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, नगराध्यक्षा सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सदरचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
 
Top