शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्यासाठी सह्यांची मोहीम
पंढरपूर,०२/११/२०२० - केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विरोधक संमत केलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान होणार आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व ओबीसी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे व पंढरपूर शहराध्यक्ष राजेश भादुले यांच्या आदेशानुसार सदरचे शेतकरी विरोधी विरोधके मागे घेण्यासाठी आज सोमवार दि.०२/११/२०२० रोजी पंढरपूर शहर कॉंग्रेस ओबीसी विभाग यांच्यावतीने पंढरपूर शहरात सह्यांची मोहीम शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने राबविण्यात आली.

यावेळी सदरची सह्यांची मोहीम सुरू केल्यानंतर काही वेळातच सुमारे ५०० लोकांनी यावर आपल्या सह्या केल्याचे दिसून आले. सदरची मोहीम ही दिवसभर सुरू असल्याचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी सांगितले.

यावेळी पिंटू महागावकर,सुरेश कांबळे,रूबाब नाडीवाले यांच्यासह ओबीसी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेस ओबीसी पंढरपूर शहरच्यावतीने शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्यासाठी सह्यांची मोहीम यशस्वी 
 
Top