पालघर -पैशाचा पाऊस पाडून डबल पैसे करून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या सुरेश भिवा काकड ,राहणार पासोडी पाडा, तालुका मोखाडा ,रमण भवर ,राहणार खानवेल दादरा नगर हवेली, कमलाकर वाघ, राहणार जुनी जव्हार, प्रमोद भामरे यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी निरोप विश्वकर्मा राहणार वापी, जिल्हा बलसाड यास पैशाचा पाऊस पाडून पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखविले त्यानुसार दिनांक ११/१०/२०२० रोजी फिर्यादीस कासा येथील जंगलात घेऊन गेले व पैसे डबल करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.आरोपी क्रमांक १ ते ४ यांनी फिर्यादी यांना दिनांक १४/१०/२०२० रोजी फोन करून सांगितले की तुम्ही जेवढे जास्त पैसे तेवढे जास्त पैसे आम्ही तुम्हाला डबल करून देऊ त्याप्रमाणे फिर्यादी हे १५/१०/२०२० रोजी २ लाख ४० हजार रुपये घेऊन आले.

  सदर आरोपींनी फिर्यादीस त्यांना जंगलात नेऊन त्यांचे डोळे बांधून बसवले.आम्ही मंत्र म्हणून पैसे डबल करतो असे सांगून सदर ठिकाणी फिर्यादी यांचे दोन लाख ४० हजार रुपये घेऊन पळून गेले. आरोपी यांनी फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून आरोपी विरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र नवरी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर गुन्ह्यातील आरोपी सुरेश भिवा काकड रमण भवर यांना अटक करण्यात आलील असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर हे करीत आहेत.

 पालघर जिल्ह्यातील नागरिकांना पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता आपण या प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास तात्काळ आपल्या नजीकच्या पोलिस ठाण्यांमध्ये संपर्क साधावा.
 
Top