मुखदर्शन देण्याच्यादृष्टीने भाविकांना ऑनलाईन दर्शन प्रणाली

पंढरपूर, २१/११/२०२०- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दि. १६ नोव्हेंबर २०२० पासून दर्शनासाठी खुले करून देण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन देण्याच्यादृष्टीने भाविकांना ऑनलाईन दर्शन प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्यासाठी मंदिर समिती संकेतस्थळावरून भाविकांना ऑनलाईन बुकींग करणे अनिवार्य आहे.त्याप्रमाणे दैनंदिन जास्तीत जास्त दोन हजार भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. तथापि भाविकांकडून होणारी मागणी विचारात घेता दि. २३ व २४ नोव्हेंबर २०२० रोजीचे ऑनलाइन मुखदर्शन पास बुकिंग आजपासून खुले करण्याचा व कार्तिक यात्रा 2020 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. याशिवाय दि.२५ व २६ नोव्हेंबर २०२० रोजी पंढरपूर शहर व परिसरात संचारबंदी असल्याने दि २५ ते २७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत श्रींचे मुखदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.


तसेच दि.२८/११/२०२० पासून पुढे ऑनलाइन मुखदर्शन पास बुकिंगबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.दि.२३ व २४ नोव्हेंबर २०२० चे ऑनलाइन मुखदर्शन पाससाठी खालील प्रमाणे स्लॉट निश्चित करण्यात आले आहेत.


वरील ऑनलाइन दर्शन बुकिंग www.vitthalrukminimandir.org/home.html या मंदिर संकेतस्थळावरून करता येईल. याखेरीज http://117.214.89.131/qms1सदरची लिंक Google Chrome,Mozilla Firefox या वेब ब्राउझरवरती कॉपी पेस्ट करावी. हि पर्याय लिंक सुद्धा आता देण्यात आली आहे याचाही वापर करावा.

सदरचे पत्रक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य महोदय आमदार रामचंद्र कदम, श्रीमती शकुंतला नडगिरे,डॉ दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा,संभाजी शिंदे , आमदार सुजितसिंह ठाकूर, हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर,एँड माधवी निगडे, हभप प्रकाश जवंजाळ,अतुलशास्त्री भगरे गुरुजी,हभप शिवाजी महाराज मोरे,पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ साधना भोसले यांच्याशी विचारविनिमय करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे
 
Top