ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी या साठी पाटी लगाओ आंदोलन

  कुर्डुवाडी,(राहुल धोका),२६/११/२०२०-ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी म्हणून आज सोलापुर जिल्ह्यातील कूर्डुवाडी शहर येथील उप जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार श्री.मुसळे यांना ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात असे म्हटले आहे की,२०२१ मध्ये होणार्‍या जनगणना कार्यक्रमात ओबीसीसाठी स्वतंञ काॅलम करुन ओबीसीची जनगणना करावी.त्यामुळे देशात ओबीसीची संख्या सरकारला कळेल.१९३१ साली जनगणना झाली होती त्यावेळी ५२% समाज ओबीसी होता.त्यामुळे २७% आरक्षण मिळाले होते.

    ओबीसी समाजाचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेञातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे जो पर्यंत जनगणनेच्या कार्यक्रमात ओबीसीसाठी स्वतंञ काॅलम होत नाही तोपर्यंत ओबीसी समाज या जनगणनेत सहभागी होणार नाही.

  आपल्या घराच्या दरवाज्यावर आम्ही जनगणनेत सहभागी नाही होणार असे फलक लावुन "पाटी लगाओ आंदोलन" हे आंदोलन करणार आहोत.

     यावेळी राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर गाडेकर,आँल इंडीया ओबीसी रेल्वे इंमप्लाॅइज असोशिएन मंडल सचिव सुरेश खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे माढा विधानसभा अध्यक्ष धनाजी कोकरे,माळी समाजाचे अध्यक्ष विशाल आप्पा गोरे,धनगर समाजोन्नती मंडळाचे सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमोडे,शिंपी समाज नेते राज ढेरे,परीट समाजाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड,राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष अभिजीत सोलनकर,आँल इंडीया रेल्वे असोशिएनचे मंडल अध्यक्ष औंदुबर सुतार, कार्याध्यक्ष संतोष सातपुते,सचिव प्रकाश खुणे, माळी समाजाचे नेते नागन्नाथ माळी सर,शिपीं समाजाचे अध्यक्ष सचिन कारंजकर,वेताळवाडीचे सरपंच रामभाऊ राऊत,धनगर समाजन्नोती मंडळाचे माढा तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे यांचे सह समाज बांधव उपस्थित होते.
 
Top