राहुल धोका यांची रेल्वे सल्लागार समितीवर सलग निवड

कुर्डुवाडी,०७/११/२०२०- कुर्डुवाडी शहरातील ज्ञानप्रवाह न्यूजचे प्रतिनिधि राहुल धोका यांची रेल्वे सल्लागार समितीवर new railway advisory commitee निवड झाली आहे.दि १/१/२०२१ ते दि ३१/१२/२०२२ पर्यंत ही निवड रेल्वे डिविजनल कमिशनर मॅनेजर यांनी जाहीर केली आहे. त्याच प्रमाणे माजी पंचायत समिती अध्यक्ष शिलाताई रजपुत,डाॅ जयंत करंदिकर, अमोल कुलकर्णी, हरिष भराटे,पत्रकार श्रीनिवास बागडे, छाया सुराणा यांचीही या समितीवर निवड करण्यात आली आहेे. शहरातील नागरिक आणि रेल्वे प्रशासनाकडून या निवडीनंतर सर्वांचे अभिनंंदन करण्यात येत आहे.

कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहिमेसाठी सतत जीवनरक्षा समितीच्या माध्यमातून राहुल धोका कार्यरत असल्याने त्यांची सलग रेल्वे समिती कडून निवड केली गेली आहे .अनिल कापुरे यांनी सबंधित पत्रे निवड करण्यात आलेल्या सदस्यांना सुपुर्त करण्यात आली आहेत.
 
Top