पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या मागण्या  केेल्या मान्य
पंढरपूर, ०२/११/२०२० - पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बाबतचे निवेदन नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांना देऊन दि.०७/११/२०२० पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ऐन दिवाळीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला होता.

  यावर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे,सह. कार्याध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष अनिल गोयल, किशोर खिलारे,जयंत पवार,संजय माने,प्रितम येळे,नागनाथ तोडकर या शिष्टमंडळाबरोबर मागण्याबाबत मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी चर्चा केली.यामध्ये शासनाकडुन पंढरपूर नगरपरिषदेस कर्मचाऱ्यांचे सहाय्यक वेतन अनुदान गेल्या अनेक महिन्यां पासुन २० तारखेच्या पुढे येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन नेहमी २१ ते २२ तारखेनंतर होते.दि.१४ नोव्हेंबर रोजी दिवाळी असल्याने दिवाळी पुर्वी म्हणजे किमान ३ नोव्हेंबर रोजी पगार करावा अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी यांनी दि.०५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पगार अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच शासनाने दि.०१/०१/२०१६ पासून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने वेळोवेळी केलेल्या आंदोलनातुन ७ वा वेतन आयोग लागु केला आहे. दि.०१/०१/२०१६ ते ३१/०८/२०१९ या कालावधीतील थकबाकीची रक्कम समान ५ हप्त्यात कर्मचाऱ्यांना देण्या बाबत मंजुरी दिली.

त्याचा पहिला हप्ता गेल्यावर्षीच अपेक्षित असताना

   त्याचा पहिला हप्ता गेल्यावर्षीच देणे अपेक्षित असताना शासनाने ७ वा वेतन अनुदानाच्या फरकाची रक्कम अद्याप पर्यत नगरपरिषदेस न दिल्याने हि रक्कम नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिलेली नाही त्यामुळे शासनाकडुन अनुदानाची रक्कम येईपर्यत र.रु.१०,०००/- 7 व्या वेतनाच्या हप्त्यापोटी मिळावेत अशी मागणी संघटनेने केली त्यावर मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती लक्षात घेवून किमान र.रु.५०००/- देण्याचे आश्वासन दिले. तसेच नगरपरिषदेचे जे कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर रजा वेतन व उपदानाची रक्कम मिळालेली नाही. सेवा निवृत्तीनंतर अनेक कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय उपचार, मुलामुलींचे लग्न कार्य,बँकाचे कर्ज यासारख्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदान व रजा वेतनाची रक्कम अदा करावी अशी मागणी केली यावर मुख्याधिकारी यांनी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे उपदान व रजावेतन देण्याचे तसेच सर्व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन दिवाळीपुर्वी अदा करण्याचे आणि ज्या नगर परिषद कर्मचाऱ्यांची सेवा सलग १२ व २४ वर्ष झाली आहे व 7 व्या वेतन आयोगातील तरतुदी नुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा १०,२०,३० वर्ष पुर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोनती लागू करणेबाबतचा प्रस्ताव नोव्हेंबर महिना अखेर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे मान्य केले.कोविड-19 च्या अनुषंगाने नागरी भागात काम करण्याऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार यांनी जोखीम पत्करुन काम केल्याने त्यांना नियमित वेतना व्यतिरिक्त र.रु.१०००/- इतकी रक्कम प्रोत्साहान पर देण्याबाबत आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना र.रु.१०००/- प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती त्यावर मुख्याधिकारी यांनी सदरची मागणी मान्य करुन दिवाळी पुर्वी वेतना बरोबरच ही रक्कम रु.१०००/- देण्याचे मान्य केले तसेच नगरपरिषदेने एखादा कर्मचारी कोविड 19 मध्ये कामकरित असताना पॉझिटीव्ह झाल्यास व त्याला रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची वेळ आल्यास त्या कर्मचाऱ्यास औषध उपचारासाठी र.रु.१ लाख रुपये पर्यंतचा खर्च देण्याचे मान्य केले होते त्यानुसार नगरपरिषदेचे चार कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत. तरी त्यांना खर्चाची रक्कम मिळावी अशी मागणी केली त्यावर मुख्याधिकारी यांनी सदर कर्मचाऱ्यांना उपचारार्थ झालेल्या खर्चाची रक्कम देण्याचे मान्य केले. संघटनेच्या वरील मागण्या मान्य झाल्याने कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव आणि सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.

   यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी पोपट जाधव, चिदानंद सर्वगोड,धनजी वाघमारे,पराग डोंगरे,दर्शन वेळापुरे, गणेश धारुरकर, संतोष क्षिरसागर,सुनिल सोनार,श्रीराम जोजारे उपस्थित होते.

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत दि.०७/११/२०२० पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ऐन दिवाळीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला होता.संघटनेच्या मागण्या मान्य झाल्याने कामगार संघटनेने नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव आणि सर्व नगरसेवकांचे आभार मानले.
 
Top