मंगल कार्यालयासाठी ,विशेषतः हिरवळीं वरील लग्नप्रसंगी उपस्थितीची मर्यादा वाढविण्याबाबत  तसेच लॉकडाऊन काळातील मनपाने मंगल कार्यालयांचा कर लाँकडाऊन काळात व्यापारी पद्धती ऐवजी घरगुती वापराच्या नियमानुसार घेण्यात यावा - ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे शासनास पत्र

पुणे दि.२६/११/२०२० - राज्यात मंगल कार्यालये मोठ्या अडचणीत आहेत. याबाबत त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील मंगलकार्यालय संघटनेनी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली व त्यांच्या समोर समस्या मांडल्या. त्यांच्या समस्यांबाबत  ना.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ना. एकनाथ शिंदे,नगरविकास मंत्री व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पत्र दिले आहे.

   त्या पत्रात लक्ष वेधले आहे की राज्यातील मंगल कार्यालयासाठी विवाह प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींसाठी २०० ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तथापि काही मंगल कार्यालये ही आकाराने मोठी आहेत. करिता साधारणतः चाळीस चौरस फुटासाठी एक व्यक्ती, या प्रमाणात मंगल कार्यालयांच्या क्षेत्रफळावर आधारित व्यक्तींना परवानगी दिल्यास,सुरक्षित अंतराचे पालनही होईल.तसेच मोठ्या मंगल कार्यालयांना काही प्रमाणात अधिक उत्पन्न मिळू शकेल अशी मागणी  ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे. 

त्याचपमाणे मंगल कार्यालयात नागरिकांच्या उपस्थितीची  मर्यादेमुळे तसेच मार्च २०२० पासून कोरोना 19 मुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन केल्यामुळे या व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.तथापि त्यांचे नेहमीची खर्च थांबलेले नाहीत.उदा लाईट बिल,पाणीपट्टी,घरपट्टी इ. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेमध्ये आहेत.

  त्यांचे निवेदनमध्ये त्यांनी मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यासाठी प्रोपर्टी टॅक्स वाणिज्य दराने आकारण्यात येतो व तो कमी करून कोरोनाच्या  कालावधीसाठी तो घरगुती दराने वसूल करण्याच्या सूचना संबंधित महानगरपालिका व नगरपालिकां यांना देण्यात यावेत याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र पत्रा द्वारे सूचना केली आहे.
 
Top