जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा कर्तृत्ववान लोकनेता आणि आमचा जवळचा मित्र हरपला

मुंबई ,दि.२८/११/२०२० - पंढरपूरचे आमदार भारत भालके Bharat Bhalke यांच्या निधनाने अत्यंत मनमिळाऊ, जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा कर्तृत्ववान लोकनेता आणि आमचा जवळचा मित्र हरपला आहे,अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले Ramdas Athawale यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.


      भारत भालके तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. पंढरपूर मंगळवेढा भागाचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांना निवडणुकीत जायंट किलर म्हणून ओळखले जात होते. पंढरपूरच्या राजकीय, सामाजिक वर्तुळात रांगडा राजकीय पैलवान म्हणून लोकप्रिय होते.त्यांचे आंबेडकरी चळवळीशी मित्रत्वाचे नाते होते. आमच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते.त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नुकसान झाले नाही तर आमचेही वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे अशी भावना ना.रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
 
Top