कोणत्याही मोबाईल कंपनीला हेवा वाटावा अशी जनतेशी अखंडीत कनेक्टीव्हीटीकोणत्याही मोबाईल कंपनीला हेवा वाटावा अशी जनतेशी अखंडीत कनेक्टीव्हीटी, हीच खरे तर तुमची शक्ती. माणसाशिवाय राहणे ही कल्पना तुम्हाला सहन होत नव्हती. कोरोनासारख्या आजारपणातुन पुर्ण बरे व्हायच्या आतच विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला न मानताच जनतेत मिसळण्याची आपली घाई आज फार मोठे नुकसान करुन गेली.


आपली गाडी म्हणजे S.T. महामंडळाची "जनता गाडी"       आमदार या पदाचं अप्रुक वाटायच्या काळात आपण आमदारपदाला खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधीऐवजी लोकसेवक बनविले. जनतेने आमदाराची गाडी थांबण्याच्या ठरावीक जागी वाट बघत थांबण्याच्या काळात आपली गाडी म्हणजे S.T. महामंडळाची "जनता गाडी" होती. "हात दाखवा, गाडी थांबवा". राजकीय, सामाजिक कार्यकर्तेच काय पण सर्वसामान्य जनता अगदी रस्त्यावर खेळणारी लहान मुलांनी हात केल्यावर थांबणारी गाडी कधी एका आमदाराची गाडी वाटलीच नाही.

     शहरातुन ठराविक मार्गाने रोज संध्याकाळी सरकोलीला जाताना ठराविक ठिकाणी बसणार्‍या व्यक्ती आजपासून पांढर्‍या गाडीला आणि त्यातुन केल्या जाणार्‍या हाताला मिस करणार हे नक्की.कधीही आऊट आँफ कव्हरेज नसणारे तुम्ही आता आमच्यासाठी कायमचे नॉट रिचेबल झालात. नाना, सगळ्याशी आपुलकीने बोलणारे तुम्ही, आज कोणाशी न बोलताच जालं, हे शक्यच नाही. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी हे खात्रीने सांगु शकतो, जनतेसाठी शेवटच्या क्षणी तुकोबांची हीच वाक्ये आपल्या मनात असतील ...

आम्ही जातो आमच्या गावा ।
आमचा रामराम घ्यावा ।।

भावपूर्ण श्रध्दांजली !

- शैलेश साळुंखे,पंढरपूर
 
Top