भारतनाना- आपुलकीच आटल पर्व !!

पंढरपूरचे आमदार भारतनाना भालके यांच्याशी झालेली भेट...गेल्या वर्षी पंढरपूर येथे झालेल्या चंदुकाका सराफ अँन्ड सन्स् प्रा.लि.यांच्या साेने आणि हिरे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नानांची झालेली ही भेट कायम आठवणीत राहिली.यावेळी चंदुकाका सराफ अँन्ड सन्स् प्रा.लि.चे किशोर जिनदत्त शहा, अतुल जिनदत्त शहा,सौ संगीता अतुल शहा, सम्यक शहा यांच्यासह सर्व स्टाफबरोबर मनमोकळ्या मारलेल्या गप्पा आजही आम्हा सर्व स्टाफच्या हृदयात घर करून बसल्या आहेत.


आज,नाना महामारीच्या संसर्गामुळे गेल्याची बातमी ऐकून सुन्न झालो... राजकारणात नानांसारख भारदस्त आणि तेवढंच मिश्किल, आपुलकीने पाठीवर थाप मारणारे व्यक्तीमत्त्व क्वचितच पहायला मिळतं.

एका रांगड्या बुलंद व्यक्तीमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली ! 

- गणेश अवघडे,पुणे
 
Top