कै.भारत नाना भालके ,आमदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नाना ,सामान्य माणसाच्या विश्वास,जिव्हाळा ,
आशा आपेक्षाना साद घालणारा ,श्रमिक ,
नाही रे गटाचा आधारवड,काळजात घर करणारा , खोट्या प्रतिष्ठेला बाजूला ठेवणारा ,प्रत्येकाशी भरभरून ,मुक्त बोलणारा,अस्सल गावरान बोलणारा ,काळाची पाऊले ओळखणारा नेता कै.भारत नाना भालके ,आमदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


"चंद्रभागेच्या वाळवंटी विठोबाचा भक्त तू 
गोरोबा चोखोबा तुकोबाचा भक्त तू 
वाळवंटी सामान्यांचा एक आश्रयदाता तू 
मतदानाच्या फडात हसत खेळत जिंकणारा तू
प्रत्येकाच्या हृदयी घर करणारा तू ,नाना घाई केलीस तू 
वाळवंटात चैतन्य अस्ताला गेलं हे खरं केलंस तू "!!

आनंद कोठडीया,कृषीरत्न,जेऊर
९४०४६९२२००
 
Top