जैन अल्पसंख्याक महासंघाद्वारे २५ नोव्हेंबर २०२० रोजी देशभरामध्ये अल्पसंख्याक स्कॉलरशिप राष्ट्रीय अभियान 

 

अकलूज, २६/११/२०२०-भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयद्वारा अल्पसंख्याक समुदायासाठी प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक स्कॉलरशिप दिली जाते. इयत्ता पहिली पासून पी.एच.डी. पर्यंत रु.५०००/- पासून रु.२०००००/- पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. Pre-matrik, post-matrik व अन्य technical courses साठी हि स्कॉलरशिप दिली जाते. या योजनेची माहिती जैन समाजाला नसल्यामुळे अनेक अल्पसंख्याक विद्यार्थी ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकत नाहीत. अखिल भारतीय संघ जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनातून देशभरातील AIJMF च्या ७५० हून अधिकच्या शाखांमधून AIJMF चे राष्ट्रीय महामंत्री संदीप  भंडारी यांच्या नेतृत्वाखाली देश भरामध्ये बुधवार दि.२५ नोव्हेंबर २०२० रोजी जैन स्कॉलरशिप राष्ट्रीय अभियानचे आयोजन करण्यात आले होते.


  या मेळाव्यामध्ये जैन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची माहिती तसेच online application या संदर्भात मोफत सुविधा पुरवली आहे,अशी महाराष्ट्राचे संयोजक स्वप्नील शहा यांनी दिली.

    २५ नोव्हेंबर २०२० रोजी अकलूज शहरामध्ये अनंत मशिनरी,अकलूज येथे ठिकाणी जैन स्कॉलरशिप राष्ट्रीय अभियानचे आयोजन केले होते.याचे उदघाटन श्री सन्मती सेवा दल संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी यांच्या हस्ते झाले.

    या अभियानाचे आयोजन जैन अल्पसंख्याक महासंघाच्या शाखेने केले असून शाखाध्यक्ष शशिन अनंतलाल चंकेश्वरा, जिनेंद्र दोशी,भरतेश वैद्य,मयुर गांधी,विरेंद्र दोभाडा, रत्नकुमार फडे,नितेश फडे, डाॅ.धिरज मेहता,निनाद चंकेश्वरा,निलेश गांधी, पुर्वल चंकेश्वरा,तन्मय दोशी यांनी हा कार्यक्रम पार पाडण्या साठी प्रयत्न केले. 
 
Top