इलेक्ट्रानिक वैद्यकीय उपकरणे ही वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती होय

पंढरपूर – “शरीरातील अंतर्भागाची संपूर्ण तपासणी करण्यासाठी व आवश्यकता वाटल्यास उपचार करण्यासाठी इलेक्ट्रानिक वैद्यकीय उपकरणे फायदेशीर ठरत आहेत. वैद्यकीय प्रकीयेमध्ये रोगनिदान, रोगाच्या स्थानाचे, स्थितीचे व विस्ताराचे अचूक मापन आणि उपचार यासाठी अनेक प्रकारच्या उपकरणांचा उपयोग सतत वाढत आहे. उपकरणातील इलेक्ट्रानिक तंत्रज्ञानामुळे ही उपकरणे आकाराने लहान तसेच किमतीने कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करण्यासाठी कोव्हीड १९ मध्ये वापरात आणली गेली. ही वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती होय.” असे प्रतिपादन बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील प्रोफेसर एन.सी.शिवप्रकाश यांनी केले.

    रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा कॉम्पोनंट ८ अंतर्गत इलेक्ट्रानिक विभागाच्या वतीने ‘आय ओटीएस इन इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल इन्स्ट्रुमेन्ट्स’या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय वेब सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मटेरियल सायन्स विभागाचे प्रमुख डॉ.एस.एस.सूर्यवंशी यांचे हस्ते झाले.त्यावळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे हे होते.

  प्रोफेसर शिवप्रकाश पुढे म्हणाले की,इलेक्ट्रानिक साधनांचा वैद्यकीय क्षेत्रातील वापरामुळे निदान आणि उपचार अचूक व स्वस्थ होण्यास मदत होते आहे. त्यामुळे साथीचे रोग व आजार आटोक्यात आणण्यास मदत झाली आहे.त्यामुळे वैद्यकीय कौशल्यांचा अचूकपणा वाढू लागला आहे. त्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.

    अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रानिक साधनांचा वापर होत असल्याने अचूकता व गतिमानता प्राप्त होण्यास मदत झाली आहे.इलेक्ट्रानिक साधनामुळे लवकर निदान व सहज उपचार होण्यास मदत होते.

   या चर्चासत्राचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय इलेक्ट्रानिक विभाग प्रमुख प्रा.अप्पासाहेब पाटील यांनी करून दिला.या चर्चासत्रास उपप्राचार्य डॉ. लतिका बागल,उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,अधिष्ठाता डॉ.तानाजी लोखंडे,रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव यांचेसह तीनशेहून अधिक विद्यार्थी व शिक्षक हजर होते.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.भीमराव काळे,प्रा.समाधान गायकवाड,प्रा.कु.रुपाली हिलाल,प्रा.सौ.सुवर्णा पवार,डॉ.अमर कांबळे, यांनी विशेष परिश्रम घेतले. तांत्रिक सहाय्य प्रा. राजेंद्र मोरे यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा. घनश्याम भगत यांनी मानले.
 
Top