अजितदादांना कार्तिकीच्या महापुजेच्या वेळी आम्ही घेरावा घालणारच- शिवस्वराज्य युवा संघटना व छावा क्षात्रवीर सेना
पंढरपूर,(नागेश आदापूरे)-मराठा समाज आरक्षणा वरील स्थगिती उठवूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्तिक एकादशी महापुजेसाठी यावे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षण सह आपल्या न्याय हक्काच्या मागण्या लोकशाही मार्गाने शांततेने व मोर्चे व आंदोलने केले आहेत. तरीही राज्य सरकार व केंद्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही आणि समाजाच्या न्याय हक्का साठी मागण्या करूनही हे दोन्हीही सरकार सतत टाळाटाळा व दुर्लक्ष करीत आहेत.मराठा विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.गेल्या अनेक वर्षापासून नोकर भरतीतील मराठा आरक्षणाच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्याही दिल्या नाहीत. तर सध्या सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थितीती दिली आहे.ती स्थितीती उठविण्यासाठी प्रत्यन केले नाही.यापुढे आमच्या न्याय हक्काच्या मागण्या बाबत केंद्र सरकारने व राज्य सरकारने सामाजिक हितासाठी मराठा समाज विद्यार्थ्यांना ठोकपणे निर्णय घेवून न्याय देण्यात यावे.जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने योग्य निर्णय नाही घेतला तर सकल मराठा समाज शांत बसणार नाही.या राज्य व केंद्र सरकाराला जागे करण्या साठी सकल मराठा समाज आणि शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य व छावा क्षात्रवीर सेना यांच्यावतीने कार्तिक एकादशीची महापुजा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरावा घालणार आहे .

 मराठा समाजला न्याय द्यावा तरचं मराठा समाज तुमचे स्वागत करेल.महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधव आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी कार्तिक एकादशीला पंढरपूर येवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेची महापुजेच्या घेरावा घालतील असे निवेदन पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना देवून मागणी करण्यात आली आहे.यासाठी महाराष्ट्रातून सर्व समाज बांधवानी सामील व्हावे असे आवाहन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे ,छावा क्षात्रवीर सेनेचे अध्यक्ष समाधान सुरवसे यांनी केले आहे.यावेळी निवेदन देताना मराठा समाजाचे युवक नेते नितीन करंडे, शिवस्वराज्य युवा संघटनेचे शहराध्यक्ष किरण शिंदे,विजय कदम,गणेश चव्हाण,नवशाक शिकलकर,नागटिळक,विशाल शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top