कुर्डुवाडी,(राहुल धोका),१६/११/२०२० -कुर्डुवाडी शहरातील आठ महिने बंद असलेली मंदिरे आज दर्शनासाठी खुली करण्यात आली. देवी देवतांना विशेष साज करण्यात आला होता.अनेक मंदिरे ही विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेली आहेत.  

   दिपावली पाडव्याच्या दिवशी म्हणजेच आज मंदिरे उघडल्याने आनंद होत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया असून अनेक ठिकाणी दर्शनास येणारे भाविक शासनाच्या नियमानुसार मास्क व सोशल डिस्टन्सींग पाळत असल्याचे निदर्शानस आले आहे. 

 शहतातील मजिदी,मंदिरे ,चर्च येथे आज लगबग दिसत असून कुर्डुवाडी शहरात कोरोना नियंत्रण असल्याने त्यामानाने चिंतेचे वातावरण कमी प्रमाणात आहे. 

अनेक ठिकाणी मुख दर्शन 

  कुर्डुवाडीतील मंदिरे उघडली असली तरी सर्वत्र केवळ मुःख दर्शन दिले जात होते. शहरात यंदा पाडवा सण अत्यंत आनंद उत्सवात साजरा होत आहे.  

     सरकारने मंदिरे उघडली याचा आनंद भाविकांच्या चेहर्‍यावर दिसत आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभमीवर सरकारने नाईलाजाने मंदिरे बंद ठेवली होती. आता ती उघडली आहेत तर मास्क व सोशल डिस्टनसिंगच पालन कराव स्वतःची काळजी घ्यावी. 

ह.भ.प.डाॅ जयंत करंदिकर ,कुर्डुवाडी
 
Top