पंढरपूर, १८/११/२०२०- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुले केल्यानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके फोडून मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा केला. राज्यातील धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करावीत अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे raj thakare यांनी राज्य सरकारकडे वारंवार केली होती.


पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरही दर्शनासाठी खुले करावे यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या समवेत महाराज मंडळींनी राज ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.


त्यावेळी मंदिर उघडण्यास सरकारला भाग पाडू असे आश्वासन राज ठाकरे यांनी महाराज मंडळींना दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्यापासून खुली केली आहेत.त्यामुळे मनसेने मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना व्यक्त करत येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.


याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने भाविकांना मास्क आणि सॅनिटायझर चे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,उपजिल्हाध्यक्ष दिलीप पाचंगे,तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष महेश पवार,आकाश धोत्रे, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुका अध्यक्ष हेमंत पवार,कृष्णा मासाळ,प्रताप भोसले, प्रथमेश पवार ,अर्जुन जाधव,सचिन शिंदे,नागेश इंगोले,वैभव इंगोले,दत्ता वलेकर,गणपत मोरे , संतोष भोईटे,महिला आघाडीच्या सौ रंजना इंगोले, सौ पूजा लवंगकर आदी उपस्थित होते.
 
Top