आर्थिक मदत प्राणी मित्र विलास शहा सर्वोदय ट्रस्ट यांच्यामार्फत


कुर्डुवाडी,(राहुल धोका),१३/११/२०२०- येथील प्राणी मित्र विलास शहा यांनी माढा तालुक्यातील खैराव भोपाल, पासलेवाडी,खैरेवडी या गावातील शेतमजुरी करणाऱ्या पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी पशुखाद्य cattle feed वाटप केले.यामध्ये गाय,बैल,शेळी आदि प्राण्यांचा समावेश असून एकूण २५ पशूंना प्रति पशु दहा किलो इतके पशुखाद्य वाटप करण्यात आले.याकामी आर्थिक मदत प्राणी मित्र विलास शहा सर्वोदय ट्रस्ट यांच्यामार्फत करण्यात आली.


विलास शहा यांनी आपले पूर्ण जीवन मुक्या प्राण्यांसाठी व्यतीत केले आहे.आतापर्यंत त्यांनी प्राण्यांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांना या कार्यासाठी अनेक संस्थांनी विविध पुरस्कारही दिलेले आहेत. ते ८८ वर्षात पदार्पण करीत असतानाही मुळेगाव येथील कत्तलखाना बंद व्हावा यासाठी शासन दरबारी त्यांचे प्रयत्न चालूच आहेत.
 
Top