लव्ह जिहादच्या गुन्हेगारांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इशार्यावरून शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

पुणे,दि.२ नोव्हेंबर २०२० - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहादच्या निमित्ताने एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे.हरियाणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीसुद्धा हरियाणा राज्यात कायदा करण्याबाबत विचार मांडलेला आहे.लव जिहादच्या विषय निवडणुकीच्या प्रचाराचा होऊ शकत नाही.महत्वाचे म्हणजे काही वेळेला अल्पवयीन मुलींवरती दबाव आणून किंवा फूस लावून धर्म बदलण्यासाठी भाग पाडलं जाते. असं ठरवून मुलींना पळवणार्या टोळ्या भारतातच नव्हे तर अख्या जगात सर्वत्र आहेत.अनेक वेळा अतिरेकी विचारासाठी या अल्पवयीन मुलींचा उपयोग केला जातो,त्यांचा थांगपत्ताही लागत नाही. तिच्याकडे बघत असताना एक जणू काही मुलं जन्माला घालण्याच्या मशीन आहे अशी त्यांच्याबद्दलची भूमिका असते म्हणून हा मुद्दा महत्वाचा असला तरीपण त्याच वेळेला हे देखील विसरता कामा नये अठरा वर्षाच्या वरच्या वयोगटातील मुलगी व २१ वयाच्यावरील मुलगा अशा असणाऱ्या दोन व्यक्ती हे स्वतःच्या इच्छेनुसार कुठल्याही जातीत व कुठल्याही धर्मात लग्न करु शकतात,स्वतःचा संसार करू शकतात.
असे शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रतिपादन केले आहे.

याबद्दल निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा तात्पुरता घेऊन सोडून देण्यापेक्षा

म्हणून याबद्दल निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा तात्पुरता घेऊन सोडून देण्यापेक्षा अल्पवयीन मुलींचे हिताच्या भुमिकेतुन व धर्मांतरासाठी केली जाणारी सक्ती या चौकटी मधून विषय पाहिला जावा असे वाटते.म्हणून जे स्वच्छेने विवाह करतात आणि जिथे कुठलाही दबाव नाही त्या लोकांना भरडले जाऊ नये हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे असेही ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ yogi adityanath यांनी लव्ह जिहादच्या निमित्ताने एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. स्वच्छेने विवाह करतात आणि जिथे कुठलाही दबाव नाही त्या लोकांना भरडले जाऊ नये हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे असे शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या ना.डॉ.नीलम गोऱ्हे Dr Nilamtai Gorhe यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 
Top