मंगल कार्यालये,लॉन्स,हॉल सभागृहे यांना ५०% क्षमतेने कार्यक्रम पार पाडण्याची परवानगी मिळावी


पुणे, १९/११/२०२०- मिशन बिगिन आगेनच्या सातव्या टप्प्यात पुणे शहर व ग्रामीण विभागातील मंगल कार्यालये, हॉल,लॉन्स असोसिएशनने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांना निवेदन दिले.यात प्रामुख्याने या मंगल कार्यालये,लॉन्स, हॉल सभागृहे यांना ५०% क्षमतेने कार्यक्रम-समारंभ पार पाडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आहे.कारण १०००/२००० क्षमतेच्या सभागृहात,कार्यालयात ५० लोकांचा कार्यक्रम हा दोघांनाही परवडू शकत नाही.तसेच अशा कार्यक्रमांना आवश्यक सेवा पुरविणार्‍या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विजेची बिले, मालमत्ता कर इत्यादींमुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे.५०% क्षमतेने परवानगी मिळाल्यास सँनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंग आदि नियमांचे आम्ही काटेकोर पालन करू असे सांगितले आहे.

डॉ.गो-हे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्या संबंधित मंत्री विभागाकडे पाठवून योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.सिल्व्हर रॉक , पुणे या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाचे संयोजन माजी गटनेते अशोक हरणावळ, शिवसेना शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी केले.

यावेळी पुणे शहर ग्रामीण विभाग मंगल कार्यालय आणि लॉन असोशिएन अध्यक्ष श्रीपाल ओसवाल, महाराष्ट्र केटरिंग असो चे किशोर सरपोतदार,संजय वेलणकर तसेच पदाधिकारी कुणाल बेलदरे,सचिन चव्हाण,अरुण ढोबळे,विनय तटके आदि मान्यवर उपस्थित होते.
 
Top